Bharatrath - Bharat ki Dukan

स्वदेशी आणि आत्मनिर्भर भारतासाठी चला भारतरथ ची साथ देऊया - आपल्या नजीक च्या शेतकरी, महिला बचत गट आणि लोकल प्रोड्युसर यांना प्रोत्साहन देऊ या

रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपण आपल्या आरोग्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो.त्यामुळेच वेगाने वाढणाऱ्या शहरातील लोकांना उच्च रक्तदाब, डाइबेटीज,लट्टपणा असे अनेक आजाराने ग्रासले आहे, आणि हे सर्व झाले आहे दररोजच्या आहारातील वापरल्या जाणाऱ्या रसायनयुक्त आणि इतर अनैसर्गिक केलेल्या प्रक्रियेमुळे.

याच विषयाचा विचार करून भारतरथ या कंपनीची स्थापना झाली आहे.ही एक इकॉमर्स कंपनी असून ती शेतकरी,शेतकरी बचत गट, महिला बचत गट यांची केमिकल फ्रि, प्रीजरवेटीव फ्री उत्पादने लोकांना ऑनलाइन घरपोच उपलब्ध करून देण्यासाठीच या कंपनीची स्थापना केली आहे. त्यासाठी आपल्याला भारतरथ हे अँप डाऊनलोड करून ऑर्डर द्यावी लागणार आहे. ठाणे,पुणे शहरात सर्व ठिकाणी ऑनलाइन मागणी केल्यावर घरपोच डिलिव्हरी देत आहोत. लवकरच मुंबईतही चालू होणार आहे. ज्या लोकांना डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध नाही अशा लोकांसाठी भारतरथ एक उत्तम पर्याय आहे.

भाजी,फळे,किराणा माल,लाकडी घण्याचे खाद्यतेल, सुका मेवा, वेगवेगळ्या शेवया,लोणची, आयुर्वेदिक गुळ, पीठ, ओट्स असे घरी लागणारी सर्व उत्पादने भारतरथ कडे आहेत. स्वदेशी व आत्मनिर्भर भारतासाठी या कंपनीची स्थापन केली गेली आहे.सर्व उत्पादने वृत्तपत्र विक्रेत्यांच्या मार्फत घरपोच देण्यात येणार आहेत. त्यामुळे एकीकडे शेतकरी, शेतकरी बचत गट, महिला बचत गट यांना मदत होणार आहे तर दुसरीकडे आपल्या घरी पेपर टाकणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांना अधिकचे उत्पन्न मिळणार आहे.शेतकरी ते ग्राहक,उत्पादक ते ग्राहक या धोरणानुसार भारतरथ काम करते म्हणून ठाण्यातील सर्व लोकांना आवाहन करतो की आपण भारतरथ कडून सर्व उत्पादने खरेदी करावी व भारताला आत्मनिर्भर करण्यास मदत करावी.

जे महिला बचत गट किंवा शेतकरी गट भारतरथ शी जोडले गेलेत त्यांना त्यांच्या मालाची आकर्षक पॅकिंग कशी करावी, शिवाय मालाचा दर्जा चांगला राहण्यासाठी काय दाखल घ्यावी याचे परिपूर्ण ट्रेनिंग भारतरथ कडून दिली जाते. स्थानिक पातळीवर जी दर्जेदार उत्पादने तयार केली जातात त्यालाही बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाते. भारतरथ कोणतेही कारखान्यात तयार होणारे पदार्थ विकत नाही.येणाऱ्या काळात प्रत्येक शहरात स्थानिक दर्जेदार,रसायनमुक्त व पौष्टीक अशा आपल्या आहारात वापरल्या जाणाऱ्या फळे,भाज्या, आयुर्वेदिक उत्पादने,वेगवेगळ्या राज्यातील प्रसिद्ध मिठाई,किराणा मालापासून दररोजच्या लागणाऱ्या सर्व वस्तू भारतरथ आपल्याला आपल्या मागणी नुसार घरपोच देणार आहे. तेव्हा चला उठा आजच आपल्या दर्जेदार आहाराचा सोबती भारतरथ कडे आपली मागणी भारतरथ या अँपवर नोंदवा आणि निरोगी राहण्यासाठी तयार रहा. स्वदेशी आणि आत्मनिर्भर भारतासाठी चला भारतरथ साथ देऊ या.

दत्ता घाडगे

अध्यक्ष, Newspaper Delivery Vendors Association Thane